वसुबारसच्या निमित्ताने पांजरापोळ संस्थेतील गुरांच्या चाऱ्यासाठी देणगीचे आवाहन…
करमाळा, प्रतिनिधी – हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वसुबारस म्हणजेच आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा केली जाते. घरांत लक्ष्मीचे आगमन होण्यासाठीही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. महाराष्ट्रात वसुबारस पासून दिवाळीची सुरुवात होते. पूर्वी घरोघरी गाई-गुरे असल्याने वसुबारसेला सर्वांच्या गोठ्यात जाऊन सामुहिकपणे सर्वजण मिळून “दिन दिन दिवाळी…गाय-म्हशी ओवाळी….” म्हणत गुरांना ओवाळीत असत. कालानुरूप घरोघरी गुरे पाळण्याची प्रथा बंद झाली आणि आता क्वचितच एखाद्या ठिकाणी आवडीने गुरे पाळल्याचे दिसून येते.
करमाळा शहरात १९५३ पासुन कार्यरत असलेल्या श्री पांजरापोळ गोरक्षण संस्थेत ४० ते ४५ गायींचा सांभाळ योग्य पद्धतीने केला जातो. भाकड असल्याने रस्त्यावर सोडून दिलेल्या गाईंचा शेवटपर्यंत सांभाळ ही संस्था करते. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय सुरू असलेल्या श्री पांजरापोळ गोरक्षण संस्थेच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने नुकतेच एक आवाहन करण्यात आले आहे.
दि.०९/११/२०२३ रोजी असलेल्या वसुबारसच्या निमित्ताने संस्थेतील सर्व गाय-गुरांना वैरण-चा-यासाठी देणगी देऊन नागरीकांनी पारंपरिक वसुबारस साजरी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.भरतकुमार माणिकचंद गांधी यांनी केले आहे. पांजरापोळ संस्थेतील गुरांचा एका दिवसाचा वैरण चारा खर्च रु. २५००/- असून इच्छुकांनी यथाशक्ती एक दिवसाचा, दोन दिवसाचा किंवा आपल्या इच्छेनुसार चारा किंवा वस्तू असा खर्च उचलून संस्थेच्या पुण्यकर्मास हातभार लावण्याची विनंती गांधी यांनी केली आहे.
देणगी देण्यासाठी इच्छुकांनी संस्थेचे बॅंक अकाउंट नंबर व माहिती सोबत दिली आहे.
श्री.पांजरापोळ गोरक्षण संस्था, करमाळा जि. सोलापूर
Bank of india
Branch :- karmala
A/C no :-071620110000074
IFSC code :- BKID0000716
अध्यक्ष :- श्री.भरतकुमार माणिकचंद गांधी, करमाळा
Phonepay/Googlepay
Mo. 9423336930