नूतन सरपंच गौरव झांजूर्णे यांचा शिवसेना कार्यालयात सत्कार…
करमाळा, प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून रामवाडीचा कायापालट करणार असा विश्वास नूतन सरपंच गौरव झांजूर्णे यांनी व्यक्त केला आहे.
अटीतटीची निवडणूक जिंकल्यानंतर गौरव
झांजूर्णे यांचा शिवसेना कार्यालयात जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे हार, फेटा, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना गौरव झांजूर्णे म्हणाले की,
आमदार संजयमामा शिंदे यांचे नेतृत्वाखाली तालुक्यात विविध विकास कामे होत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व भारतीय जनता पार्टी राज्यात कारभार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रामवाडीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच पश्चिम भागात शेतकरी मेळावा घेऊन या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा दावा गौरव झांजूर्णे यांनी केला आहे.