श्री बनशंकरी मोबाईल शॉपीमध्ये ‘दिपावली मोबाईल फेस्टिव्हल-२०२३’
करमाळा, प्रतिनिधी – मानवी जीवनाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांसोबतच २१ व्या शतकात मोबाईल ही सर्वांची चौथी मूलभूत गरज ठरली आहे. या मोबाईल विश्वात शतकाच्या सुरुवातीस यशस्वी पदार्पण केलेल्या शिवराज आणि बसवराज या चिवटे बंधुंच्या बनशंकरी मोबाईल शॉपीने क्रांती घडवली आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी श्री बनशंकरी मोबाईल शॉपीमध्ये वर्षभर विविध योजना राबविल्या जातात. याचाच एक भाग म्हणून दिवाळीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे बनशंकरी मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांना बक्षिसांची लयलूट करता येणार आहे.
दिवाळी २०२३ निमित्त श्री बनशंकरी मोबाईल शॉपीने ‘दिपावली मोबाईल फेस्टिवल’चा उपक्रम राबविला आहे. यानुसार ग्राहकांना मोबाईल खरेदीवर रु.11,000 पर्यंतचा हमखास डिस्काउंट तर मिळणारच आहे, यासोबतच ग्राहकांना स्क्रॅच कुपनद्वारे बक्षिसे सुद्धा मिळणार आहेत. कुपन स्क्रैच केल्यानंतर लगेचच त्यावरील बक्षिस वितरीत करण्यात येणार आहे.
दिपावली मोबाईल फेस्टिवल स्क्रॅच कुपन योजनेत पहिले बक्षिस होंडा शाईन ही दुचाकी असून इतर भेटवस्तूंमध्ये फ्रिज, स्मार्ट टीव्ही, होम थिएटर, मिक्सर, मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ हेडफोन, पॉवर बॅंक आणि साऊंड बार इत्यादींचा समावेश आहे. १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यंत हा दिपावली मोबाईल फेस्टिवल चालणार आहे. या फेस्टिव्हल दरम्यान ११,००० रुपयांपर्यंत हमखास डिस्काउंट व असंख्य बक्षीसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
याशिवाय झिरो डाऊन पेमेंट, शुन्य टक्के व्याजदराने ग्राहकांना विविध कंपन्यांकडून वित्त पुरवठाही उपलब्ध असून सिबिल स्कोअर कमी असले तरी फायनान्स मिळवून देण्यात बनशंकरी मोबाईल शॉपी सहकार्य करणार आहे. मोबाईल खरेदीवर २ वर्षांच्या वॉरंटीसह क्रेडिट कार्ड वर रु. ८,००० पर्यंतचा कॅशबॅक आणि जुना मोबाईल एक्सचेंज सुविधा देखील या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत.
तरी ग्राहकांनी श्री बनशंकरी मोबाईल शॉपीच्या ‘दिपावली मोबाईल फेस्टिवल’मध्ये सहभागी होऊन भरघोस बक्षिसे मिळवण्याच्या संधीचा पुरेपूर आनंद लुटावा, असे आवाहन श्री बनशंकरी मोबाईल शॉपी यांच्याकडून करण्यात आले आहे.