गांजा ओढणाऱ्या सहा जणांवर करमाळा पोलिसांची कारवाई…
करमाळा, प्रतिनिधी – शहरासह परिसरातील वेगवेगळ्या भागात गांजा ओढणाऱ्या सहा जणांना करमाळा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना गोपनीय माहितीच्या आधारावर दि. १८/०५/२५ रोजी दिवसभरात या कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर करमाळा पोलिसांनी तालुक्यातील देवळाली येथील ग्रामपंचायती जवळ जब्बार इस्माईल पठाण (वय-७० वर्षे, रा. दत्त पेठ, करमाळा), पांडे येथील सरपंच हॉटेलच्या मागील बाजूस आडोशाला विठ्ठल एकनाथ इंदोरे (वय-७०, रा. न-र्हे रोड, गोकुळ नगर, वडगाव धायरी फाटा, ता. हवेली, जि. पुणे), करमाळा शहरातील ३६ एकर परिसरात माधव मुरलीधर ननवरे (वय-३८ वर्षे, रा. म्हसेवाडी, ता. करमाळा), करमाळा स्मशानभूमी येथे प्रवीण लक्ष्मण साडेकर (वय-२८ वर्षे, रा. भवानी पेठ, करमाळा), करमाळा शहरातील आय सी आय सी आय बँकेजवळील ओढ्याजवळ राजेंद्र सखाराम सोरटे (वय-५६, रा. चांदगुडे गल्ली, करमाळा) आणि तालुक्यातील रोशेवाडी येथील नागोबा मंदिराजवळ बाळू बाबा गोडसे (वय-५८, रा. रंभापुरा, करमाळा) अशा सहा जणांना अमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहात पकडले आहे.
याबाबत पो.ह. जोतीराम बाळसराफ, पो.शि. धनाजी रामगुडे, पो.शि. सोमनाथ गावडे, पो.शि. समीर शेख, पो.शि. गणेश शिंदे आणि पो.शि. अमोल बागल यांनी दिलेल्या फिर्यादींवरून करमाळा पोलिसांनी वरील सहा आरोपींवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
.
.
.
.
.
.