भावकीबरोबर भांडण करायला येत नसल्याने चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात घातला दगड…


करमाळा, प्रतिनिधी – भावकी बरोबर भांडण करायला न येता ‘भांडण करु नका’ असे समजावुन सांगणा-या पुतण्याच्या डोक्यात चुलत्याने दगड मारला आहे. तालुक्यातील विहाळ येथे ही घटना घडली आहे.

याबाबत सचिन वैजिनाथ मारकड (वय-२८, रा. विहाळ) याने दि. १८/०५/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १८ रोजी सायंकाळी सहाच्या सुमाराम तो त्यांच्या घरासमोर असताना त्याचा चुलता तात्या शंकर मारकड हा तेथे आला व सचिनला म्हणाला की, तु आपल्या भावकीबरोबर भांडण करायला का येत नाही? तेव्हा सचिनने ‘भांडण करु नका’ असे समजावुन सांगत असताना त्याने ‘तु मला कोण समजावुन सांगणारा?’ असे म्हणुन तेथेच पडलेला दगड हातात घेवुन सचिनच्या डोकीत मारुन त्याला जखमी केले व शिवीगाळी दमदाटी करुन तेथुन निघुन गेला.

सचिन मारकड याच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी तात्या शंकर मारकड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक संदेश चंदनशिवे हे पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page