क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या करमाळा तालुका उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर बनसोडे तर कार्याध्यक्षपदी राजू देवकाते यांची नियुक्ती…


करमाळा, प्रतिनिधी – क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या करमाळा तालुका युवक उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर बनसोडे तर कार्याध्यक्ष पदी राजू देवकाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी करमाळा तालुक्यातील जातेगाव दौऱ्या दरम्यान या निवडी केल्या आहेत.

यावेळी करमाळा तालुका अध्यक्ष अमोल घुमरे यांनी प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष कसबे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे विचार तळागाळातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवून संघटनेच्या वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नूतन उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नवनाथ शिंदे, राजेंद्र घुमरे, तानाजी शिंदे, दीपक शिंदे, बाळासाहेब शिंदे, नितीन शिंदे, शिवशंकर जगदाळे, महावीर नरसाळे, दत्ता किनीकर मारुती कसबे ज्ञानेश्वर शिंदे आदी जण उपस्थित होते.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page