बाजार समितीमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा जयवंतराव जगताप यांच्या हस्ते आज शुभारंभ -सौ. शैलजा मेहेर…
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील मुख्य बाजारातील पूर्व यार्ड मधील रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज शुक्रवार दि. ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या उपसभापती सौ. शैलजा बबन मेहेर यांनी दिली आहे.
सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक अनिकेत शिंदे यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, व्यापारी, हमाल-तोलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पायाभूत सुविधा व विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीतील सर्व अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर कामास पणन संचालक यांची मान्यता घेतली असून याकामी पणन संचालक विकास रसाळ, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, सहाय्यक निबंधक कार्यालय यांचे सहकार्य मिळाल्याचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी सांगितले आहे.
.
.
.
.