करमाळा शहरातील आनंदी ज्वेलर्समध्ये सोन्याच्या झुमक्यांची चोरी…
करमाळा, प्रतिनिधी – सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात झुमक्याची जोडी पाहण्यासाठी आलेल्या महिलेने हातचलाखीने अर्धा तोळे वजनाची झुमक्याची जोडी हातोहात लांबवली आहे. शहरातील मेन रोडवरच्या आनंदी ज्वेलर्स येथे मंगळवार दि. ६ रोजी ही घटना घडली आहे.
याबाबत अभिजीत अशोक दोशी यांनी दि. ०७/०५/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ०६/०५/२०२५ रोजी दुपारी ०२/४५ वाजण्याच्या सुमारास आनंदी ज्वेलर्स (मेन रोड, करमाळा) येथे एक अनोळखी महीला (वय-अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे) कानातील झुमके पाहण्याच्या उद्देशाने असता तिने दुकानातील ४६,००० रु. किमतीचे अंदाजे ५ ग्राम वजनाची एक सोन्याची झुमक्याची जोडी चोरुन नेली आहे.
दोशी यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार भाऊराव शेळके हे पुढील तपास करत आहेत.
.
.
.