श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन कामास राहुल जांभळे यांच्याकडून देणगी
करमाळा, प्रतिनिधी – श्री कमलादेवी मंदिराच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या जतन व संवर्धनाच्या कामास हळूहळू मूर्त स्वरूप येत आहे. पुरातन दगडी स्वरूपातील मुळ मंदिर पाहून भाविकांचा उत्साह वाढत असून जीर्णोद्धार कामास देणगीचा ओघही वाढला आहे. याच भावनेतून श्री देवीचामाळ येथील राहुल बाबुराव जांभळे यांनी सोमवार दि. ०५ मे रोजी मंदिराच्या जतन व संवर्धन कामास रु. ५,५०१ ची देणगी दिली आहे. त्याबद्दल मंदिर समिती तर्फे राहुल जांभळे यांचा रविराज पुराणिक आणि पद्माकर सूर्यपुजारी यांच्या हस्ते श्री कमलादेवीची प्रतिमा आणि मानाचा श्रीफळ देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सध्या प्रगती पथावर आहे. या जिर्णोद्धार कार्यास भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आवाहन श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. ऑनलाईन देणगी देण्यासाठी भाविकांनी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक अशोक गाठे (मो. नं. ९४०४७०८९२४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
.
.
.