पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची दमदार कामगीरी; शहर व तालुक्यातील आठ जण हद्दपार…
करमाळा, प्रतिनिधी – वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही वर्तनात सुधारणा न करता दहशत निर्माण करणारांवर करमाळा पोलिसांनी हद्दपारची कारवाई केली आहे. महिला विषयक, वाळू चोरी, प्राण्यांची अवैध वाहतूक व कत्तल असे विविध गुन्हे दाखल असणाऱ्या आठ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत करमाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
१) उमेश राजेंद्र गलांडे (रा. चिखलठाण नं १),
२) शाहरूख आयुब कुरेशी (रा. मौलाली माळ,करमाळा),
३) समाधान उर्फ दत्तात्रय कल्याण लोहार (रा. निमगाव), ४) संपत विठ्ठल मारकड (रा.शेलगाव वांगी),
५) संतोष बिभिषण फरतडे (रा. सातोली),
६) करण अंबादास खरात (रा. सिध्दार्थनगर, करमाळा),
७) आशपाक बाबासाहेब मुलाणी (रा. कंदर),
आणि
८) ओंकार दादासाहेब पुजारी (रा. देवीचा माळ, करमाळा) यांचेविरूध्द दाखल गुन्हयाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले असताना त्यांचे हातून भविष्यात गुन्हे घडून सार्वजनिक शांतता भंग होवून नये म्हणून वेळोवेळी प्रतिबधंक कारवाई करण्यात आली आहे. परंतु तरी सुध्दा त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. उलट ते पुन्हा पुन्हा गुन्हे करून लागले. तसेच करमाळा तालुका परिसरातील गोरगरीब जनता ही त्याचे दहशतीस घाबरून पोलीस ठाणेस तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळे जनतेमध्ये भितीचे व दहशतीचे तसेच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या जिवीतास धोका भय व इजा होण्याची शक्यता निर्माण झालेली झाल्याने लोकांना भयमुक्त करण्यासाठी व समाजाचे दैनदिन जीवन सुरळीत व शांततामय होण्यासाठी तसेच सामाजिक स्वास्थ व मालमत्तेस धोका होवू नये यासाठी वरील सर्वांना उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग कुर्दुवाडी यांनी सोलापूर, पुणे, धाराशिव या जिल्ह्यांतून ६ महिने ते २ वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलीसांमार्फत सदर तडीपार इसमांना सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर (सोलापूर ग्रामीण), उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील (करमाळा उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच करमाळा पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने केली आहे.
यापुढे ही गुन्हेगारी वृत्तीचे लोक त्यामध्ये वाळू चोरी, प्राण्यांची कत्तल करणारे, बेकायदेशीर सावकारी करणारे, तसेच महिलांची छेडछाडी करणारे, मालाविषयी गुन्हे करणारे व शरीराविषयी गुन्हे करणारे असे विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांचेवर हद्दपारीची कार्यवाही प्रस्तावीत आहे.
-विनोद घुगे,
पोलिस निरीक्षक, करमाळा.
.
.
.
.
.