वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात करमाळा शहरात मुस्लिम समाज बांधव एकवटला…
तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन
करमाळा, प्रतिनिधी – वक्फ सुधारणा विधेयक २०२५ चा जाहीर निषेध करत वक्फ विधेयक त्वरित मागे घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन करमाळा मुस्लिम समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष माजी नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी यांच्या हस्ते मंगळवारी देण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, वक्फ सुधारणा विधेयक २०२५ मुस्लिम समाजाच्या विरोधात असून हे विधेयक घाई गडबडीत पास करून एका समाजाविषयी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय निषेधार्य आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय भारत देशात राहणाऱ्या जवळपास ३५ कोटी मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात असून आम्ही या विधेयकाचा तीव्र निषेध करीत आहोत. सदरील विधेयक व त्यातील तरतुदी ह्या संविधानाच्या कलम २१,२५ व ३० या तरतुदीचे सरासर उल्लंघन करीत असून देशात राहणाऱ्या नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्य व मूलभूत अधिकारावरच गदा आणत आहे.
यावेळी अमीर तांबोळी, अमीन बेग, अतिक बेग, मुस्ताक शेख, बिलाल मदारी, दस्तगीर मदारी, उमर मदारी, नजीर मदारी, समीर शेख, असीम बेग, अफरोज पठाण, जुबेर मिर्झा यांच्यासह शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.
.
.
.