चिखलठाण येथे धडाडणार राम सातपुते यांची तोफ…


महायुती आदिनाथ बचाव पॅनलची आज प्रचार सभा…
करमाळा, प्रतिनिधी – आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडीकडून स्थानिक स्टार प्रचारकां मार्फत प्रचार केला जात असला तरी महाविकास आघाडीकडून आज चिखलठाण नं.१ येथे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांची सभा होणार आहे.

महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या प्रचारार्थ आज सायंकाळी ७.०० वाजता चिखलठाण नं.१ येथे होणाऱ्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राम सातपुते हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. करमाळा तालुक्यातील राजकारणावर विशेष लक्ष ठेवणाऱ्या तसेच माढ्याचे शिंदे बंधू यांच्याशी राजकीय वैर असलेल्या अकलूजकरांवर ते कोणती तोफ डागणार, याची उत्सुकता तालुक्यातील सभासदांना आता लागलेली आहे.

कंदर येथे रविवारी झालेल्या सभेवरून आदिनाथच्या प्रचारामध्ये महायुती आदिनाथ बचाव पॅनलने आघाडी घेतल्याचे दिसून येत असून आता शेवटच्या टप्प्यात निर्णायक अवस्थेमध्ये स्टार प्रचारक म्हणून राम सातपुते आज चिखलठाण नं.१ येथे मा.आ. शिंदे यांच्या पॅनलच्या प्रचारासाठी येणार आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सभेत बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे उपस्थित राहणार आहेत. सदर सभेसाठी मोठ्या संख्येने चिखलठाण नंबर एक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जेऊर ऊस उत्पादक गटाचे उमेदवार चंद्रकांतकाका सरडे यांनी केले आहे.

.

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page