संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने भगवान महावीर पालखी मिरवणुकीचे स्वागत…
करमाळा, प्रतिनिधी – भगवान महावीर जयंतीनिमित्त तालुक्यातील जेऊर येथे गुरुवारी जैन बांधवांनी भगवान महावीर पालखी मिरवणुक काढली. संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने या पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, भगवान महावीर यांच्या अहिंसा आणि अपरीग्रह या दोन महान मानवी मूल्यांवर सकल जैन धर्माचे विचार मानव जातीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. शांती प्रिय जैन समाजाची शिकवण सर्वच समाजाने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.
यावेळी बाळासाहेब सूर्यवंशी, निलेश पाटील, जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ, आदिनाथ माने, सोमनाथ जाधव, सागर कोठावळे, धनंजय गारुडी, हेमंत शिंदे, पांडुरंग घाडगे आदींसह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.
.
.