आळसुंदे-वरकुटे शिव रस्त्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; दीड तासापासून वाहतूक खोळंबली…
राणा वाघमारे यांचे जेसीबी वर चढून शोले टाईप आंदोलन
करमाळा, विशाल परदेशी – तालुक्यातील वरकुटे-आळसुंदे शिवरस्त्याच्या प्रलंबित प्रश्नासाठी आज शुक्रवार दि. ११ रोजी राणा दादा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रास्ता रोको केला असून करमाळा कुर्डूवाडी रस्ता एक तासापासून बंद आहे. पर्यायी रस्ता करून दिल्याशिवाय रस्त्यावरून न उठण्याचा पावित्रा वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी घेतला आहे.
ग्रामस्थांच्या या उपोषणामुळे करमाळा-कुर्डूवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या असून आंदोलन करते वाघमारे हे जेसीबी वर जाऊन चढून बसल्याने प्रशासनाला संवाद साधण्याचा अडचणी येत आहे. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त असून तहसील प्रशासनाच्या वतीने श्रीमती काझी यांनी या राष्ट्राचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तो न्यायालयीन वाद खाजगी असल्याचे सांगत उपोषणकर्ते आपल्या निर्णयावर ठाम असून रस्ता केल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान ऊन वाढत चाललेले असल्याने उपोषणकर्ते ग्रामस्थ आणि प्रशासनासह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होत आहे. प्रशासनाने आजच्या आज पर्यायी रस्ता काढण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे.
.
.
.
.