डॉ. हॅनेमन यांच्या जयंती निमित्त करमाळ्यात उद्या होमिओपॅथिक उपचार शिबीर…
करमाळा, प्रतिनिधी – होमिओपॅथीचे जनक डॉ. हॅनेमन यांच्या जयंती निमित्त करमाळा उद्या गुरुवार दि.१०/०४/२०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होमिओपॅथिक उपचार शिबीर होणार असल्याची माहिती डॉ. बिपीन परदेशी यांनी दिली आहे. शहरातील एच.डी.एफ.सी. बँकेसमोरील जीन मैदान शॉपींग सेंटर येथील सुरेखा होमिओपॅथी क्लिनिक येथे हे शिबीर होणार आहे.
याबाबत सविस्तर बोलताना डॉ. बिपिन परदेशी यांनी सांगितले आहे की, होमिओपॅथीचे जनक डॉ. हॅनेमन यांच्या जयंती निमित्त सुरेखा होमिओपॅथी क्लिनिक येथे थायरॉइड, उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांवर मोफत तपासणी व उपचार केले जातील. यासोबतच या शिबीरात थायरॉइड व साखर तपासणी ५०% सवलतीच्या दरात केली जाणार असून दोन महिन्यांची होमिओपॅथिक औषधे मोफत दिली जाणार आहेत. होमिओपॅथिक उपचारासाठी पेशंटच्या मानसिक, शारिरीक स्थिती व आजारांची संपूर्ण माहिती घेवून योग्य औषधे दिली जातात. त्यामुळे पेशंटचे जुने रिपोर्ट सोबत घेवून येणे आवश्यक आहे.
योग्य होमिओपॅथिक औषधोपचाराने आजार पूर्णपणे बरा होऊन सर्व औषधे बंद होतात. त्यामुळे शहर व तालुक्यातील रुग्णांनी या होमिओपॅथिक शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सुरेखा होमिओपॅथी क्लिनिकचे डॉ. बिपिन परदेशी यांनी केले आहे.
नावनोंदणी संपर्क:
डॉ. बिपीन परदेशी – Mo.9922122989
अभिषेक चुंबळकर – Mo.9763291193
.
.
.
.
.