खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल व आधुनिक व्यायाम शाळेचे करमाळा येथे उद्घाटन संपन्न…


करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील श्री देवीचामाळ येथे खंडोबा मंदिरा पाठीमागे भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या माध्यमातून मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल व आधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन तसेच इतर पैलवान व जेष्ठ वस्ताद मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, आमचे सहकारी मित्र अफसरतात्या जाधव यांच्या माध्यमातून आमचे प्रेरणास्थान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाने क्रीडा संकुल व आधुनिक व्यायाम शाळा तालुक्यातील मल्लांना उपलब्ध करून दिली आहे. या क्रीडा संकुलामध्ये सर्व सोयी, सुविधा देऊन उत्कृष्ट असे मल्ल नक्कीच घडवू.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल हे तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक आदर्श क्रीडा संकुल म्हणून भविष्यामध्ये नावारूपाला आलेले दिसेल. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून गणेश चिवटे व पैलवान अफसर जाधव यांनी उभारलेल्या संकुलाला तालुक्यातील मल्लांनी प्रतिसाद द्यावा. कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता या संकुलातून आदर्श व निरोगी पैलवान घडावेत व भविष्यात करमाळा तालुक्यातील मल्ल महाराष्ट्र केसरी सारख्या गदेचे मानकरी व्हावेत.
-विनोद घुगे,
पोलिस निरीक्षक, करमाळा.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र केसरी चंद्रहासबापू निमगिरे, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष कन्हैयालाल देवी, पै.सुनील सावंत, पै.अनिल फाटके, माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे, वस्ताद जालिंदर जाधव, आदम शेख, आजिनाथ कोळेकर, देवराव चौधरी, मारुतीराव जाधव, भगवान गिरीगोसावी, काकासाहेब सरडे, अभिजीत मुरूमकर, अमोल पवार, नितीन झिंजाडे, सोमनाथ घाडगे, लक्ष्मण शेंडगे, मोहन शिंदे, अनिल जाधव, प्रवीण जाधव, सचिन घोलप, विजय घोलप, विजय लावंड, प्रशांत ढाळे, अतुल फंड, दादासाहेब इंदलकर, नानासाहेब मोरे, बंडू शिंदे, विष्णू रणदिवे, सचिन गायकवाड, जयंत काळे पाटील, भैय्या गोसावी, हर्षद गाडे यांच्यासह तालुक्यातील कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page