ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर यांना मातृशोक
करमाळा, प्रतिनिधी – शहरातील मुस्लिम मोहल्ला येथील रशिदाबी शमशुद्दीन कबीर (वय ९१) यांचे गुरुवार दि. ०६ रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे सचिव तसेच दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर आणि माजी मंडलाधिकारी हुस्नदिन कबीर यांच्या त्या मातोश्री तर सैराट फेम सल्या उर्फ अरबाज शेख यांच्या त्या आजी होत. रशिदाबी या अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. मुस्लिम धर्मात रमजानच्या पवित्र महिन्यात मृत्यू येणे पवित्र मानले जाते.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५ वाजता मुस्लिम मोहल्ला येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे.