महीलांच्या कर्तृत्व गुणांना सिद्ध करण्यासाठी निखिल चांदगुडे यांचा महीला उद्योग प्रदर्शन उपक्रम…


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
करमाळा, प्रतिनिधी – युवासेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी करमाळा शहरात भव्य महिला उद्योग प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मुख्यतः महिला उद्योजकांसाठी असलेल्या या प्रदर्शनात महिलांनी लावलेले विविध स्टॉल पाहता चांदगुडे यांचा हा उपक्रम नवोदित महिला उद्योजकांसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. ९ फेब्रुवारी ते मंगळवार दि. ११ फेब्रुवारी असे तीन दिवस बायपास रोड वरील छोटू महाराज सिनेमा थिएटरच्या प्रांगणात हे प्रदर्शन भरले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे करे पाटील, ॲड. नाना कारंडे, पै. विकी शिंदे, सतीश नीळ, अनिल अनारसे, प्रा. शिवाजी बंडगर, बाबासाहेब सरडे, जगदंबा मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक काळे सर आणि शिक्षकवृंद, संतोष लाड, योगेश सोरटे, भाजप शहरप्रमुख जगदीश आगरवाल, ॲड. प्रियाल आगरवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनातील स्टॉलमध्ये अनेक महिला उद्योजकांनी छोट्या-मोठ्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. यात फ्राईड मोमोज, फ्राईड राईस, दालचा राईस, आईस केक, भेळ, पाणीपुरी, साखरेचे रुखवत अशा तयार खाद्यपदार्थांसह शेवया कुरड्या, पापड्या, सांडगे आदी उन्हाळी वाळवणीचे पदार्थ आणि चटणी, लोणचे, मसाला हे पदार्थ विक्रीचे स्टॉल आहेत. यासोबतच या प्रदर्शनात ब्युटी प्रॉडक्ट्स, इमिटेशन ज्वेलरी आणि लग्नसराईत विशेष आकर्षण ठरणाऱ्या आरी वर्कच्या ब्लाऊज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय प्रधानमंत्री सूर्य घर, घरगुती वापराचे छोटे गॅस शेगड्या, रॉयल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून घरासाठी विविध शासकीय सवलती सुलभ कर्ज योजना उपलब्ध असून या प्रदर्शनात स्वप्नातील घराचे बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकास इलेक्ट्रिक स्कुटी भेट दिली जाणार आहे.

करमाळ्यात पहिल्यांदाच होत असलेल्या महिला उद्योग प्रदर्शनाचा लाभ शहर व तालुक्यातील सर्वांनी घेण्याचे आवाहन युवासेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निखिल चांदगुडे यांच्या माध्यमातून छोटू महाराज थिएटर येथे भरवलेल्या प्रदर्शनामुळे उद्योगी महिलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. या प्रदर्शनाचा अनुभव घेऊन महिला भगिनी भविष्यात निश्चितच उचित ध्येय गाठतील.
-दिग्विजय बागल,
युवा नेते, शिवसेना.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना सांकेतिक भाषेत वाढदिवसाच्या वैशिष्ट्यपूर्ण शुभेच्छा दिल्या. यानंतर यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांची मेजवानी दिली.

.

.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page