करमाळ्यातील कमलाई अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर गगनभरारी…
कु. सिद्धी देशमुख ठरली भारतातील पहिली सर्वात लहान अबॅकस ग्रॅज्युएट
करमाळा, प्रतिनिधी – प्रो ऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ४ जानेवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय अबॅकस परीक्षेत १५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या परीक्षेत शहरातील कमलाई अबॅकस क्लासेसच्या ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या परीक्षेचा निकाल दि. ६ फेब्रुवारी रोजी लागला असून या परीक्षेत कमलाई अबॅकसच्या कु. सिद्धी पृथ्वीराज देशमुख (वय-१० वर्षे) हीने भारतातील पहिली सर्वात लहान अबॅकस ग्रॅज्युएट होण्याचा बहुमान पटकावला आहे.
कु.सिद्धी हिच्यासह कमलाई प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसची कु. दिक्षा दत्तात्रय दिवटे ही सुद्धा अबॅकस ग्रॅज्युएट ठरली आहे. यासोबतच लेवल 1st मध्ये क्लासेसचा वरूण राम शेंडगे ५ मि. ३८ सेकंदात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम तर आरुष अमोल नलवडे ६ मिनिटांत १०० पैकी ७८ गुण मिळवून तृतीय आला आहे. लिटल चॅम्प सिरीज C मध्ये ६ मिनिटांत १०० पैकी ९६ गुण मिळवून राघव गजराज चिवटे याने प्रथम तर लिटल चॅम्प सिरीज B मध्ये ६ मिनिटांत १०० पैकी ९६ गुण मिळवून कु. अर्पिता अमित परदेशी हीने प्रथम तसेच लिटल चॅम्प सिरीज A मध्ये ६ मिनिटांत १०० पैकी ९४ गुण मिळवून ऋषीका राहूल अंधारे हीने द्वितीय तर दिया अच्च्युतराव कामठे हीने ६ मिनिटांत १०० पैकी ९२ गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. लेवल 2nd मध्ये मृणाल विनोद वारे याने ६ मिनिटांत १०० पैकी ७६ गुण मिळवून तृतीय क्रमांक आणि लिटलचॅम्प सिरीज A मध्ये रणवीर कमलाकर सापते याने ६ मिनिटांत १०० पैकी ७४ गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
याशिवाय सृष्टी अमर निर्गुणकर, अर्पित यशराज दोशी, ईश्वरी अर्जुनसिंग परदेशी, श्रावणी गणेश क्षिरसागर, स्वरा महेश क्षिरसागर, ईश्वरी सारंग पुराणिक, श्रेयस श्रीकांत चव्हाण हे या स्पर्धेत उपविजेते (कॉनसोलेशन) ठरले आहेत. तसेच रुद्र नितीन कावळे, युवराज संतोष सापते, अविराज रामेश्वर राठोड, पृथ्वीराज संतोष सापते, वैष्णवी गणेश क्षीरसागर, सर्वेश भुजंग नेटके, श्रेया संदीप बोकन, आदित्य विलास त्रिंबके, श्रेया गणेश कळसाईत, ईश्वरी औदुंबर माकोडे, रिचल प्रतीक दोशी, श्रेया विनोद दाभाडे, श्रीतेज परशुराम घनवट, वेदिका सारंग पुराणिक, सुयश संदीप बोकन, प्रणिती औदुंबर माकोडे, मधुरा मयूर मुसळे, श्रेया श्रीकांत चव्हाण, जानवी प्रकाश पौळ, क्षितिजा विशाल माने, ध्रुव शरद जाधव आणि सानवी महेश क्षीरसागर हे फायनलिस्ट म्हणजे Best parformar आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कमलाई अबॅकस क्लासेसच्या संचालिका सौ. एम.एम. मुसळे यांनी अभिनंदन केले आहे.
.
.
.
.
.
.
.
.