छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पंचशील स्पोर्टस अँड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने करमाळ्यात मॅरेथॉन स्पर्धा…
करमाळा, प्रतिनिधी – शहरातील पंचशील स्पोर्टस अँड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तालुका स्तरिय मॅरेथॉन स्पर्धा आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा सोमवार दि.१७ रोजी तर मंगळवार दि.१८ रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे.
करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार असून पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मुख्याधिकारी सचिन तपसे, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप, बहुजन रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष देवा अण्णा लोंढे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, शिवजयंती कमिटीचे अध्यक्ष सुनील सावंत, हमाल पंचायतचे ॲड. राहुल सावंत, मा . नगरसेवक संजय सावंत आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
बुधवार दि.१९ रोजी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून यानंतर मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच स्केटिंग स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेल्या सात्विक श्रीकांत गरड याचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पंचशील स्पोर्ट्स अँड सोशल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामा भाऊ लोंढे, संस्थेचे उपाध्यक्ष उमरान मुलाणी, पैलवान ग्रुपचे अध्यक्ष सनी जाधव, गणेश झाकणे, सिद्धांत सरोदे, अमोल आव्हाड रवी ओहोळ, अक्षय उबाळे, गणेश कांबळे, लखन कुंभार, विनायक दाभाडे, आकाश दामोदर, बाळू आव्हाड, सुनील कांबळे, सोनू घोडके, तुषार साखरे, सतीश चौगुले, अमजद शेख, पप्पू पठाण, अनिकेत जाधव, अफजल मुलाणी, संतोष भोसले, ऋषिकेश सूर्यवंशी, मुन्ना शेख, रितेश लोंढे, सार्थक लोंढे, दिनेश जांभळे, नागेश ओहोळ, शुभम कुंभार, इमरान दारु आदीजण परिश्रम घेत आहेत.
.
.
.
.
.
.