ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले; गुलमरवाडीतून रात्रीतून दुचाकी आणि मोबाईल लंपास…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गुरुवारी मध्यरात्रीनंतर कंदर येथील सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नाची घटना ताजी असतानाच गुलमरवाडी या गावातून शनिवार रात्री ते रविवारी पहाटे दरम्यान एक दुचाकी आणि एक मोबाईल चोरीची घटना घडली आहे.
या चोरीबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्रीनंतर रविवारी पहाटे १ ते ३ सुमारास गुलमरवाडी या गावातील तात्याराम विठ्ठल देवकाते यांची एम एच 42 ए जे 4909 ही दूचाकी घरासमोरुन चोरीला गेली आहे. याशिवाय गुलमरवाडी गावातीलच आण्णासाहेब बापु माने यांचा मोबाईल सुद्धा चोरीला गेला आहे.
या घटनेबाबत करमाळा पोलिसांना कळविण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चोरी झालेली MH 42 AJ 4909 ही दुचाकी कोणाला आढळल्यास करमाळा पोलीस अथवा तात्याराम देवकाते (गुलमरवाडी, मो.नं.9022731847) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.
.
.
.
.
.
.