AI तंत्रज्ञान आधारित शेती करणाऱ्या धुळाभाऊ कोकरे यांच्या शेती क्षेत्राला कृषी खात्याची समक्ष भेट…


करमाळा, प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने सोलापूर जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम दि. २९ जानेवारी २०२५ रोजी कोकरे आयलॅन्ड कुगाव या ठिकाणी द्रोपदी शेतकरी गट (कुगाव) व कृषी विभाग महाराष्ट्र राज्य याच्या समन्वयातून आयोजित करण्यात आला होता.

यावेळी द्रोपदी शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात करत असलेले विविध प्रयोग, विविध डेमो प्लाॅट, शेतीत AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, केळीची परदेशातील निर्यात, शेतीचा पर्यटनासाठी वापर, मंडल कृषी विभाग जेऊर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा यांच्या मार्गदर्शनातून बदल करण्यात आलेली पिक पद्धती, महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुदानातून देण्यात आलेल्या अवजारांचा शेतातील प्रत्यक्ष वापर यांची सोलापूर जिल्ह्यातील कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन समाधान व्यक्त करून मार्गदर्शन केले. याशिवाय सर्वांनी वनभोजनाचा आस्वाद घेऊन कोकरे आयलॅन्ड येथील उजनी बॅकवाॅटर परिसरातील बोटींगचा आनंद घेतला.

यावेळी प्रकल्प संचालक कांतप्पा खोत (आत्मा, सोलापूर), कृषि उपसंचालक अभिजीत धेडे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, सोलापूर), उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे (कुर्डूवाडी), उपविभागीय कृषी अधिकारी रामचंद्र माळी (सोलापूर), तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण (करमाळा), तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे (अक्कलकोट), तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन (माढा), तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव (सांगोला), तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर (माळशिरस), तंत्र अधिकारी मंगळूरे (सोलापूर), मंडळ कृषी अधिकारीजीवन जगदाळे (बार्शी), मंडळ कृषी अधिकारी सुधीर काशीद (बार्शी), मंडळ कृषी अधिकारी श्रीमती सांगळे, मंडळ कृषी अधिकारी मधुकर मारकड (आय एस ओ मानांकन, जेऊर), मंडळ कृषी अधिकारी काशिनाथ राऊत (केम), मंडळ कृषी अधिकारी अनिल चव्हाण (करमाळा), मंडळ कृषी अधिकारी देवीदास चौधरी (केतुर), पंकज मडावी (KVK मोहोळ), मा. संचालक चंद्रकांत सरडे (कृषी उत्पन्न बाजार समिती, करमाळा), विजय कोकरे, नवनाथ कोकरे, किसन कोकरे व करमाळा तालुक्यातील सर्व कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते. द्रोपदी शेतकरी गटाचे अध्यक्ष धुळाभाऊ कोकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.

.

.

.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page