श्रेया नवलेचे वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश…
करमाळा, केत्तूर प्रतिनिधी रवि चव्हाण – स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्यावतीने मराठवाडा विभागातून घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये तालुक्यातील केतुर नं.२ येथील कु. श्रेया प्रवीण नवले हीने मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
कु. श्रेया ही केतुर नं. २ च्या नेताजी सुभाष माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेत श्रेया ने पाचवी ते सातवी गटात मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशानंतर तिची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेच्या धाराशिव विभागाच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला.
या विद्यार्थिनीला विद्यालयाचे शिक्षक के.पी. धस यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे प्राचार्य के. एल. जाधव, पर्यवेक्षक भिमराव बुरुटे व सरपंच सचिन वेळेकर यांनी श्रेया नवले हिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
.
.
.
.
.
.
.