अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उद्या केममध्ये; युगंधर संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थिती…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील केम येथील युगंधर ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘सोलापूर उद्योग रत्न २०२४-२५’ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रविवार दि. २ फेब्रुवारी केम येथील इंद्रायणी लॉन्स येथे सायं. ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात उद्योग विश्वात उत्तुंग यश मिळवलेल्या करमाळा तालुक्यातील उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. या कार्यक्रमासाठी सोनाली कुलकर्णी या उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह ओहोळ यांनी दिली आहे.
.
.
.
.
.
.
.
.