गिलेन-बेरे सिंड्रोम (GBS) आजाराबाबत करमाळा नगर परिषदेचे प्रसिध्दीकरण…
करमाळा, प्रतिनिधी -सध्या गिलेन-बेरे सिंड्रोम (GBS) हा आजार इतर जिल्ह्यामध्ये आढळून आलेला असला तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्याप या आजाराचा रुग्ण आढळून आलेला नाही. तरीही या आजाराची सर्वसाधारण लक्षणे व त्याबाबत नागरीकांनी घ्यावयाची काळजी याबाबत करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी जाहिर प्रसिध्दीकरणा द्वारे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
यावेळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आजाराची सर्वसाधारण लक्षणे खालीलप्रमाणे सांगण्यात आली आहेत.
१) अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा,
२) अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी
३) जास्त दिवस अतिसाराचा (डायरीया) त्रास,
४) पोटदुखी आणि
५) ताप व मळमळ किंवा उलट्या होणे.
या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी घ्यावयाची काळजी
१) पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही, यासाठी पाणी उकळूनच घेणे आवश्यक आहे.
२) दररोज अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
३) वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा. (उदा. खाण्यापुर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे.)
४) शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.
५) रस्त्यावरचे, उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
याशिवाय खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी जीबीएस रूग्ण आढळून आल्यास त्वरीत शासकीय आरोग्य यंत्रणांना कळविण्याचे तसेच या आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधावा, असे जाहिर आवाहन करमाळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
या आजाराची शक्यता लक्षात घेता शहराच्या स्वच्छतेवर नगरपालिकेने भर दिला असून याबाबत योग्य ती काळजी नगरपालिका घेत आहे. याशिवाय शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छ आणि योग्य साधनसामग्रीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-सचिन तपसे,
मुख्याधिकारी, क.न.पा.
.
.
.
.
.
.
.
.
.