जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या नियुक्त्या रद्द; तालुक्यातील जुन्या सदस्यांचा भ्रमनिरास…



करमाळा, विशाल परदेशी – राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या राज्य सरकारने आज दि.२८ रोजी तातडीने आदेश काढून रद्द केल्या आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.३०) होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध मनसुबे घेऊन हजर राहण्याच्या तयारीत असलेल्या या पदांवरील जुन्या सदस्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

राज्यपालांच्या आदेशाने शासनाच्या नियोजन विभागाच्या अवर सचिव सु.वि. कांबळी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात दि.२८ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवार दि.३० रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ नवनिर्वाचित आमदार आणि खासदारांनाच बसता येणार आहे.

मागील सरकारच्या काळात जिल्हा नियोजन समितीवर करमाळा तालुक्यातून आमदार नारायण पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे नामनिर्देशित तर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, करमाळा हमाल पंचायतचे ॲड.राहूल सावंत आणि मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती होती. मंगळवारी अचानकपणे या नियुक्त्या रद्द झाल्याने आता केवळ आमदार पाटील हेच गुरुवारच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार आहेत.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page