करमाळा शहरातून ४६ गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; दोघेजण ताब्यात
करमाळा – मालवाहू टेम्पोमधून ४६ गोवंश जनावरे दाटीवाटीने वाहून नेताना करमाळा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सोमवार दि.२० रोजी सायं. ७ वाजण्याच्या सुमारास शहरातील यशकल्याणी सेवाभवन समोर हा टेम्पो पकडण्यात आला आहे.
याबाबत पो. ना. वैभव राजेंद्र ठेंगल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.२०/०१/२५ रोजी सायं. ७ वाजण्याच्या सुमारास शहरातील यशकल्याणी सेवाभवन समोरील रस्त्याने आरोपी साहिल रियाज कुरेशी हा सोहेल गफार कुरेशी (रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याच्याशी संगणमत करुन आयशर क्र. एम एच १३ सी यू ८०८८ या टॅम्पोमध्ये एकून ४० लहान जर्शी गाईचे खोंड व मोठ्या एकून ६ जर्शी गाई असे एकूण ४६ जनावरे दाटीवाटीने कोंबून त्यांना निर्दयतेने वागणूक देऊन, चारा पाण्याची व औषध पाण्याची सोय न करता कत्तलीकरीता वाहतूक करताना मिळून आला आहे.
या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी साहिल रियाज कुरेशी आणि सोहेल गफार कुरेशी यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पो.हे.कॉ. पांडुरंग आरकिले हे पुढील तपास करत आहेत.
.
.
.
.
.
.
.