केळी घेऊन लाखोंची फसवणूक; कंदरच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल…
करमाळा – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन ती पुढे निर्यात करणाऱ्या ॲग्रो कंपनीकडून केळी विकत घेऊन पैसे न देता लाखोंची फसवणूक केल्याची घटना करमाळा येथे घडली आहे. या फसवणूकीत तालुक्यातील कंदरच्या एकासह वाशी (मुंबई) च्या एका व्यापाऱ्याचा समावेश आहे.
याबाबत राहुल नामदेवराव जगताप (रा. मेन रोड, करमाळा) यांनी २०/०१/२५ रोजी करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या मालकीच्या आर.जे.ॲग्रो कंपनीतून तालुक्यातील कंदर येथील मोरे फ्रुट कंपनीच्या दिग्विजय सुभाष मोरे तसेच बावा ग्रुप या कंपनीच्या सोहेल ए. (रा. वाशी मुंबई) व्यापाऱ्यांनी ५ कंटेनर केळी विकत घेतली होती. दि. ०४/०६/२४ ते १७/०६/२४ पर्यंत झालेल्या या व्यवहारात बाकी असलेले रु. २२ लाख ६४ हजारांच्या रकमेची वारंवार मागणी करूनही ती अद्याप दिली नसल्याने जगताप यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
जगताप यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार वाडगे पुढील तपास करीत आहेत.
.
.
.
.
.
.