करमाळा बसस्थानक कॉंक्रिटीकरणाचे काम बंद ठेवण्याचे विभाग नियंत्रकांचे आदेश…
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा बस आगारात सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे काम मुरूमाचा वापर करून निकृष्ट पद्धतीने होत असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी हे काम बंद ठेवण्याची मागणी केली होती. यावर राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रण श्री. गोंजारी यांनी अंदाजपत्रकाप्रमाणे खडी वापरून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करावे, तोपर्यंत हे काम बंद ठेवण्याची सूचना दिली आहे.
चिवटे यांच्या तक्रारीनंतर एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री. गोंजारी, विभागीय अभियंता श्री. चौधरी, कनिष्ठ अभियंता श्री. राठोड आगारप्रमुख वीरेंद्र होनराव यांनी सोमवार दि. २० रोजी संयुक्तपणे या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख चिवटे यांच्यासह, शहर प्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख चंद्रकांत राखुंडे उपस्थित होते.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा बस स्थानकातील सिमेंट रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. वीस ते पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर करमाळा आगारातील रस्त्यांना मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे करमाळा आगारातील रस्ता मजबूत होणे महत्त्वाचे आहे. या कामात कोणतीही कमतरता सहन करणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख चिवटे यांनी दिला आहे.
.
.
.
.
.
.
.