कोळगाव धरणातून बेकायदा वाळू उपसा; बोटीसह परराज्यातील तिघे ताब्यात, बोटमालक फरार…



करमाळा – कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उपसा केलेल्या वाळूसह यांत्रिक बोट आणि इतर सामुग्री करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तालुक्यातील निमगाव (ह) येथे धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील बोट मालकाच्या बोटीद्वारे तीन परप्रांतीयांकडून हा उपसा सुरू होता.

याबाबत पो.शि. सतिश वामन एनगुले (नेमणूक – करमाळा पोलिस ठाणे) यांनी दि.१५/०१/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१५/०१/२५ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) येथील जलाशयातून आरोपी १) फैजुल माफीजुद्दीन शेख, (वय-२८ वर्षे, रा. गुहीटोला, पो. पलाशगच्छी, आंचल-उधवा, थाना राधानगर, ता. उत्तर पलाशगच्छी, जि. साहेबगंज, राज्य-झारखंड, २) असरफ असाराऊल शेख, (वय२१ वर्षे, रा. दरगांडगा, ता. उधुआ, जि. साहेबगंज, झारखंड व ३) रबुल सजल शेख, (वय-२७ वर्षे, रा. बिकल टोला, प्लासगाछी, ता. उत्तर पलासगछी, जि. साहेबगंज, झारखंड) व बोटमालक ४) अविनाश अभिमान हांगे, (वय-३१, रा. सोनारी, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी संगनमत करून पर्यावरणाचा ऱ्हास होईल हे माहित असताना देखील महसुल विभागाचा परवाना व रॉयल्टी नसताना कोळगाव धरणाच्या जलाशयातून बोटीने व सक्शन पाईपने वाळू काढून त्याचा साठा करून ती चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला आहे.

या कारवाईत करमाळा पोलिसांनी ३,००,००० रु. किंमतीची एक यांत्रीक बोट व इतर सामुग्री, ८०,००० रू. किमतीची एक सक्शन पाइप इतर सामुग्री आणि २०,००० रू. किमतीची एकूण अंदाजे ४ ब्रास वाळू असा एकूण ४,००,००० रु. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पोलिसांनी तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून पुढील कारवाईची तजवीज ठेवली आहे.

करमाळा पोलिसांनी सदर गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली असून बोट मालक फरार आहे. स.पो.नि. रोहित शिंदे हे याबाबत अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page