छोटा हत्ती पलटी होऊन केतुरच्या प्रौढाचा मृत्यू: चालकावर गुन्हा दाखल…
करमाळा – तालुक्यातील राजुरी गावच्या शिवारात छोटा हत्ती पलटी होऊन झालेल्या अपघातात केतुर नं.२ येथील प्रौढाचा मृत्यू झाला आहे. दि. १४/०१/२५ रोजी रात्री ही घटना घडली आहे.
याबाबत मयताचा मुलगा अनिकेत कृष्णा उर्फ किसन पवार (वय-२४, रा. केतुर नं.२) याने करमाळा पोलिसांत दि. १६/०१/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १४/०१/२५ रोजी रात्री त्याचे वडील कृष्णा तुकाराम पवार (वय-५१ वर्षे, रा. केत्तुर नं. २) हे कोर्टी येथून छोटा हत्ती वाहन क्र. एम एच / ४५ ए एफ – ९६६१ यात बसून येत होते. रात्री ९/३० च्या सुमारास वाशींबे-राजुरी रोडवर राजुरी गावचे शिवारात शिंदे वस्तीजवळ चालक जावेद अजीज शेख (रा. केत्तुर नं. २) याने त्याचे ताब्यातील टाटा ऄस हे वाहन हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे चालवुन पलटी केले. या अपघातात सदर टेम्पोखाली सापडुन वडील कृष्णा तुकाराम पवार हे गंभीर जखमी होऊन मयत झाले आहेत.
अनिकेत पवार याच्या फिर्यादीवरून सदर छोटा हत्ती वाहनाच्या चालकावर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पो.नि. पी.बी. टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.
.
.
.
.
.
.
.