कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने जनावरे चोरीचा संशय; घडले मात्र वेगळेच…!!!
करमाळा – मध्यरात्री कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजामुळे जाग आलेल्या दांपत्याला जनावरे चोरीचा संशय आल्यामुळे त्यांनी गोठ्यात पाहिले. मात्र जनावरे त्यांच्या ठिकाणी शाबूत असली तरी या दांपत्याची अल्पवयीन मुलगी मात्र घरात दिसली नाही. तालुक्यातील पोंधवडी येथे ही घटना घडली आहे.
याबाबत १७ वर्षे १ महीना वय असलेल्या अल्पवयीन मुलीच्या पित्याने करमाळा पोलिसात दि. १६/०१/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १५/०१/२५ रोजी रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे ते कुटुंबीयांसह झोपी गेले होते. त्यानंतर पहाटे ३ वाजता कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने ते उठले आणि पत्नीसह घराबाहेर बांधलेली जनावरे दावणीला असल्याचे पाहीले. यानंतर त्यांनी घरात पाहीले असता त्यांची अल्पवयीन मुलगी झोपलेल्या खोलीत आढळली नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने मुलीच्या पित्याने करमाळा पोलिसांत अज्ञाताने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
.
.
.
.
.