अनधिकृतपणे जोडलेली केबल नेण्यास प्रतिबंध; महावितरणच्या अभियंत्याच्या तक्रारीवरून आळजापूरच्या चौघांवर गुन्हा दाखल…



करमाळा – डिपी मध्ये अनधिकृतपणे जोडलेली केबल काढून सरकारी वाहनात टाकण्यास प्रतिबंध करणाऱ्या आळजापूर (ता.करमाळा) येथील चौघांविरुद्ध महावितरणच्या अभियंत्याने फिर्याद दाखल केली आहे. सोमवार दि. १३ रोजी दुपारी १२/३० वाजण्याच्या सुमारास आळजापूर शिवारातील गपाट वस्तीवर हा प्रकार घडला आहे.

याबाबत महावितरणच्या करमाळा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता विशाल दिलीप सुर्यवंशी यांनी दि. १३/०१/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १३/०१/२५ रोजी दुपारी १२/३० च्या सुमारास महावितरणच्या सहकारी कर्मचाऱ्यांसह ते आळजापूर शिवारातील गपाट वस्तीवरील डिपीतून अनधिकृतपणे टाकलेली केबल काढीत असताना भारत रामचंद्र गपाट, ज्ञानदेव भारत गपाट, किसन पंढरीनाथ गपाट आणि अर्जुन भारत गपाट (सर्व रा. आळजापूर ता. करमाळा) या चौघांनी त्यांना केबल काढण्यास प्रतिबंध करुन, ढकलुन देऊन शासकिय कामकाजात अडथळा आणला. तसेच त्यानंतर ते कर्मचाऱ्यांसह सरकारी वाहनाने निघाले असताना चार चाकी आडवी लावुन जाण्यास प्रतिबंध केला.

सुर्यवंशी यांच्या तक्रारीवरून करमाळा पोलिसांनी वरील चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक पी.बी. टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

.

.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page