नवरात्रोत्सवात राजे ग्रुपने राबविलेले उपक्रम स्तुत्य -तहसीलदार शिल्पा ठोकडे…


करमाळा, प्रतिनिधी – वर्षभरातील बहुतांश सार्वजनिक उत्सव हे केवळ पुरुषांसाठी असतात मात्र येथील रंभापुरातील राजे ग्रुपने नवरात्रोत्सवात महिलांसाठी राबविलेले उपक्रम स्तुत्य असून राजे ग्रुप चा आदर्श घेऊन इतर सामाजिक संघटनांनी सुद्धा देवीच्या उपासने सोबतच आई जगदंबेचे रूप असलेल्या माता भगिनींसाठी विविध उपक्रम घेऊन नवरात्र उत्सव साजरा करावा, असे मत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी व्यक्त केले. बुधवारी सकाळी रंभापुरातील श्री काळुबाई मंदिरात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी पुढे बोलताना तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले की गावाच्या एका बाजूला दुर्लक्षित पडलेल्या श्री काळु आई मंदिर आणि परिसराची स्वच्छता करून राजे ग्रुपने ठिकाणी महिलांना पूजाअर्चा करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या देवस्थानचे पावित्र्य राखण्यास मदत होत आहे. शिवाय नवरात्र काळात भाविकांसाठी फराळाचे नियोजन करून परिसरातील महिलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांचेही आयोजन केले आहे. त्यामुळे महिला भगिनींच्या आनंद हीच खरी देवीचे आराधना असल्याचे सांगत तहसीलदार ठोकडे यांनी श्री काळुबाईची मनोभावे आरती केली. आरती नंतर दिवसभर भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले

शहरातील रंभापुरा येथे पुणे रोडवर असलेले हे मंदिर मागील काही वर्षांपूर्वी अनावश्यक झुडुपांमुळे दुर्लक्षित होते. राजे ग्रुपच्या सदस्यांनी या मंदिराभोवतालची झुडपे श्रमदान करून हटवली. तसेच मंदिराच्या बाजूने कठडा आणि संरक्षक भिंत बांधून मंदिरासमोरच्या जागेची स्वच्छता केली. त्यामुळे परिसरातील महिला भगिनींना या मंदिरात देवीच्या पूजेसह इतर धार्मिक कार्यक्रम करणे सोईचे झाले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. लहाणांसाठी आणि महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, खेळ पैठणीचा यासह गरबा दांडिया असे मनोरंजनात्मक कार्यक्रम नऊ दिवस राबवून विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येत आहेत.

या उत्सवाच्या आयोजनासाठी मंडळाचे सदस्य अमर करंडे, संतोष सापते, महेश गोडसे, रामा करंडे, सुखदेव लष्कर, परशुराम तांबे, राहुल कवडे, बापूसाहेब तांबे, वसंत जाधव, बालाजी चव्हाण, नागेश दुधाट, आकाश कवडे, सागर जाधव, प्रजोत करंडे, राजेंद्र दुधाट, नितीन करंडे, अमित बुद्रुक, राजेंद्र दुधाट, नितीन करंडे, सौरभ आवटे, सार्थक करंडे, पप्पू साबळे, कमलेश कदम आणि सौरभ आवटे आदीजण परिश्रम घेत आहेत.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page