दिघे साहेबांवर आधारित “धर्मवीर २” चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात आज बाईक रॅली…
करमाळा, प्रतिनिधी – धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचावर आधारित “धर्मवीर २” हा चित्रपट आजपासून शहरातील छोटू महाराज थिएटर येथे प्रदर्शित होत आहे. २७ सप्टेंबर म्हणजे क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर दिघे साहेबांना वंदन म्हणून युवासेनेच्या वतीने करमाळा शहरातून भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती युवा सेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर बोलताना चांदगुडे यांनी सांगितले आहे की, धर्मवीर आनंद दिघे यां विचारांचा वारसा मुख्यमंत्री शिंदे हे सक्षमपणे चालवत असून सर्वसामान्यांना विविध योजना, शेतकरी हिताच्या पिक विमा तसेच कर्जमाफी, वीज बिल माफी आदींसह डान्स बार बंदी, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ शिक्षा होण्याचे धोरण राबवणारे संवेदशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक आहे. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळयातील शिवसेनेची वाटचाल चालू असून करमाळ्यासह आज देशभरात “धर्मवीर २” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ११ वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली करमाळा बायपास येथील छोटू महाराज थिएटर येथे येणार असून या ठिकाणी पृथ्वीराजभैय्या सावंत यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते या चित्रपटाचे उद्घाटन होणार आहे. करमाळा तालुका शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना धर्मवीर २ हा सिनेमा मोफत दाखविणार असल्याचे युवा सेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील सर्व युवकांनी या बाईक रॅली मध्ये सामील होण्याचे आवाहन निखिल चांदगुडे यांनी केले असून दिघे साहेबांच्या चरित्रावर आधारित असलेला हा चित्रपट सर्व जनतेने बघावा व त्याचा थोर विचार अकस्मात आणावा यासाठी तिकीट दर कमी केले असल्याची माहितीही चांदगुडे यांनी दिली आहे.
.
.
.