साडे येथील गुलाबाई वामन चव्हाण यांचे दुःखद निधन…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील साडे येथील कै. गुलाबाई वामन चव्हाण (वय- ७५) यांचे गुरूवार दि. ५ रोजी सकाळी आठच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. गुरुवारी दुपारी १ वाजता साडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. गुलाबाई यांच्या पाठीमागे एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. साडे ग्रामपंचायत सदस्य दत्ता चव्हाण यांच्या त्या आजी होत्या.