शिवसेनेतर्फे करमाळात वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप…
करमाळा, प्रतिनिधी – संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून जगद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील जवळपास तीन हजार वारकऱ्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. करमाळा तालुका मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून बुधवारी दिवसभर हा उपक्रम राबविण्यात आला.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने सुरू केलेल्या वारकरी आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. महेंद्र नगरे यांनी केले. यावेळी वारकऱ्यांना गुडघेदुखीवरील क्रीम, जखमेवरील क्रीम, डोळ्यातील औषध, थंडी-ताप, खोकला, पित्त, पोटदुखी, जुलाब आदी प्रकारच्या आजारांवर तात्काळ उपचार देण्यात आले. विशेषतः पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना गुडघेदुखी, सांधेदुखी वरील ५००० ट्यूब यावेळी वाटण्यात आल्या. उपचारां सोबतच वारकऱ्यांना करमाळातील प्रसिद्ध धना-ताना गरमागरम वडापाव सह सोनपापडी आणि गुळाचा चहा देण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुका प्रमुख राहुल कानगुडे, शहरप्रमुख संजय शीलवंत, युवा सेना तालुका अध्यक्ष नवनाथ गुंड,
जेऊर युवा शहर प्रमुख माधव सूर्यवंशी, शिवसेना जेऊर शहर प्रमुख बाळासाहेब करचे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष ज्योतीताई शिंदे, शेलगाव शाखाप्रमुख बनसोडे, जेऊर शाखाप्रमुख संजय जगताप, रंभापूरा शाखाप्रमुख केशव साळुंखे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, हिवरवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मेरगळ, उद्योजक मिलन जपे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
.
.
.
.
.