आषाढी एकादशीपूर्वी नगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवून शहरात साफसफाई करावी -मा.नगरसेविका बानू फारुक जमादार
करमाळा, प्रतिनिधी – आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी दिंड्या, पालख्यांचे आगमन होते. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून शहरात साफसफाई करून स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नगरपालिकेने प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी नगरसेविका बानू फारुख जमादार यांनी केली आहे.
याबाबत सोमवार दि. ८ रोजी करमाळा नगरपालिकेत दिलेल्या निवेदनात जमादार यांनी म्हटले आहे की,
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातून वारकरी पंढरपूर येथे जातात. करमाळा शहरातून ही विदर्भ, मराठवाडा इत्यादी भागातून पायी तसेच विविध वाहनांतून अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. वारीच्या निमित्ताने शहर भरात विविध ठिकाणी अनेक छोट्या/मोठ्या दिंड्या-पालख्या जेवणाकरिता किंवा मुक्कामी असतात.
महाराष्ट्रातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या दिंडी सोहळ्यांपैकी ३५ ते ४० हजार वारकऱ्यांची श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी करमाळ्यातून जाते. रावगाव मार्गे शहरात येणारी ही पालखी नागोबा मंदिर, किल्ला वेस या मार्गावरून शहरात प्रवेश करते. शहरातील या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचरा दिसत आहे. काही ठिकाणी वेड्या बाभळी वाढलेल्या आहेत.
या सर्व समस्यांचे निवारण करून शहर व परिसरात जंतुनाशक पावडर व फिनेल फवारणी करण्याची मागणी जमादार यांनी केली आहे.
.
.
.