तथागत भगवान बुद्ध यांची २५६८ वी जयंती उत्साहात…
करमाळा, प्रतिनिधी – दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा (करमाळा), विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा शहरामध्ये गुरुवारी महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध यांची २५६८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यागमुर्ती माता रमाई बुद्ध विहार सिद्धार्थ नगर या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप व धूप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना उपस्थित सर्वांच्या वतीने घेण्यात आली. तसेच बुध्दगया (बिहार) येथून बुद्ध दर्शन घेऊन आलेल्या आयु. नि. कविता शिंदे यांनी धम्मरथामधील तथागत: भगवान बुद्ध यांच्या पवित्र मंगलमय प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्मरॅलीस सुरूवात करण्यात आली. यावेळी बुध्दगया येथून आणलेली धम्मशॅल आयु. प्रशांत लिंबराज कांबळे यांना भेट म्हणून देण्यात आली.
करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून धम्मरॅलीची सवाद्य मिरवणूक निघाली. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले पुतळा, बोधिसत्व प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. या धम्मरॅली मिरवणूकीत सिद्धार्थ नगर येथील आयु.रमेश भारत कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असलेला “भिमकन्या टिपरी आणि लेझीम संघ” हे खास आकर्षण होते. शहरातील प्रमुख चौकांमध्ये टिपरी आणि लेझीम पथकाने आपली कला सादर केली.
याशिवाय आयु. जयकुमार कांबळे आणि माजी नगरसेविका आयु.नि.सविताताई जयकुमार कांबळे यांची भिमकन्या आयु.नि. संस्कृती जयकुमार कांबळे हीने मिरवणुकीत तलवारबाजी आणि डबल काठी यांचे थरारक प्रात्यक्षिके करून दाखवून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर भिमराव (फकिरा) दिलीप कांबळे यांचा बाल कराटे आणि नाॅनचॅक चॅम्पियन बौद्ध उपासक आयु. रामजी भिमराव कांबळे या बाल कलाकारानेही प्रत्येक चौकामध्ये डबल काठीचे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
या धम्मरॅलीमध्ये विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बहुउद्देशीय सामाजिक संस्था रजि. करमाळा मधील सर्व पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे, उपाध्यक्ष नागेशदादा कांबळे, खजिनदार रमेशअण्णा कांबळे, सचिव लक्ष्मणराव भोसले, सदस्य राजू आव्हाड, माजी नगरसेवक मुकुंद कांबळे, श्रीनिवास कांबळे तसेच भारतीय बौद्ध महासभेतील सर्व केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, तालुक्यातील सर्व कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्ते, विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील सर्व उपासक, उपासिका, तसेच त्यागमुर्ती माता रमाई बुद्ध विहार सिद्धार्थ नगर मधील सर्व बौद्ध उपासक व उपासिका तसेच भीम नगर, सिद्धार्थ नगर, सुमंत नगर, आण्णाभाऊ साठे नगर मधील सर्व बौद्ध व बहुजन समाजातील बांधवांनी तसेच लहान मुले, मुली यांनी धम्मरॅलीत सहभागी होऊन या धम्मरॅलीची शोभा वाढविण्यात मोलाचे योगदान दिले.
त्याचबरोबर ता.उपाध्यक्ष आयु. महाराजा शंकर कांबळे, सरचिटणीस भिमराव सावळा कांबळे, ता.खजिनदार आयु.प्रमोद शंकरराव गायकवाड, करमाळा-भिमाई ग्रूपचे अध्यक्ष आयु.जयकुमार रामदास कांबळे, आयु. रमेश भारत कांबळे, सचिव भाऊनाना कांबळे यांनी तथागत भगवान बुद्ध जयंती आणि धम्मरॅलीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
हा संपूर्ण कार्यक्रम करमाळा ता.अध्यक्ष केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य आयु.प्रशांत लिंबराज कांबळे गुरूजी यांच्या नेतृत्वाखालील आणि मार्गदर्शनानुसार संपन्न करण्यात आला. शेवटी भारतीय बौद्ध महासभेचे सचिव आयु.गायकवाड, आयु.जोगदंड साहेब (जेऊर- केडगाव) यांनी धम्मरॅलीत सहभागी झालेल्या उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून 9 वा.30 मि. निघालेल्या बुद्ध जयंतीच्या धम्मरॅलीचा-बरोबर 1 वाजता नियमानुसार सांगता समार॔भ करण्यात आला.