जगताप विद्यालयाचे सेवानिवृत्त लिपिक विठ्ठल ताटी यांचे निधन…


करमाळा, प्रतिनिधी – शहरातील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक श्री. विठ्ठल अंबाजी ताटी (सर) वय- ७३ यांचे सोमवार दि. २० मे रोजी सायंकाळी ६:४५ वाजता अहिल्यानगर (नगर) येथील त्यांच्या राहत्या घरी (पाइपलाइन परिसर) निधन झाले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर नेफ्ती अमरधाम
येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयात नोकरी करत असतानाच्या काळात आपल्या अतिशय शांत आणि संयमी स्वभावामुळे शहरातील सुतार गल्ली, काकडे गल्ली सह शहरातील अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध राखले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. विठ्ठल ताटी यांच्या मागे पत्नी, दोन मुले (गिरीश, अमित), एक मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page