वैद्यकीय मदत मिळालेले सर्व रुग्ण व नातेवाईक कमळाला मतदान करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या संवेदनशील प्रतिमेचा कमळाला फायदा -जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा दावा…



करमाळा, प्रतिनिधी – मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील गरजू रुग्णांना जवळपास एक कोटी तीस लाखाची मदत झाली असून शेकडो रुग्णांना शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्याची सेवा उपलब्ध झाली आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह निंबाळकर हे प्रचंड मतांनी विजयी होणार, असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे.

करमाळा शहरातील एमआयडीसीचे प्लॉट वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे.
करमाळा नगरपालिकेसाठी जवळपास 20 कोटींचा निधी मिळाला आहे. महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यात 50% सवलत दिल्यामुळे महिलावर्ग प्रचंड खुश आहे. करमाळा तालुक्याला या वर्षी विक्रमी 147 कोटी रुपयांचा दुष्काळ निधी मिळाला आहे. शिवसेनेच्या वतीने ब्लड बँक व डायलिसिस सेवा सुरू करून तालुक्यातील जनतेला मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या वतीने दोन वेळेस जवळपास दररोज एक हजार लोकांना मोफत जेवण दिले जात होते. जवळपास दोनशे रुग्णांना मोफत रेमडीसिव्हर इंजेक्शन शिवसेनेने मोफत दिले.
शिवसेनेचे अहोरात्र 24 तास मोफत रुग्णसेवा रुग्णवाहिका उपलब्ध आहे. करमाळा तालुक्यात शेकडो आरोग्य शिबिर घेऊन पस्तीस हजार लोकांना मोफत चष्मे दिले आहेत. शेकडो दिव्यांगांना कृत्रिम हात व पाय दिले हात व पाय दिले आहेत. कोरोना काळात तालुक्यातील सर्व पुढारी घरात बसले होते पण शिवसैनिक सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात होते.

ऊसाचे आंदोलन असो, शेतकऱ्यांवरच्या अत्याचाराच्या आंदोलन असो सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी शिवसेनाच रस्त्यावर उतरते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लागणार आहे. उजनी धरणात कायम पाणी राहील म्हणून वरील टाटा धरणाचे पाणी उजनी धरणात सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या दृष्टीने पत्र व्यवहार सुरू आहे. शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार महिना महाराष्ट्र शासन देत आहे.

करमाळा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना व जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जवळपास 170 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. नवीन टाऊन हॉल इमारत व प्रशासकीय इमारतीसाठी 11 कोटी मंजूर झाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. करमाळा शहरातील मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेला वर्ग वाढ देण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून कोणत्याही शेतकऱ्याला विज बिल मागितले जात नाही. सर्व विज बिल माफ करण्याचा लवकर शासन निर्णय घेणार आहे. करमाळा तालुक्यातील जवळपास 11,700 मराठा बांधवांना कुणबीचे दाखले दोन महिन्यात देण्यात आले आहेत. अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भरीव विकास कामांमुळे त्यांच्या संवेदनशील प्रतिमेचा फायदा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना होऊन ते प्रचंड मतांनी विजयी होणार असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page