मुस्लिम विकास परिषद आयोजित खतना कॅम्प संपन्न…
करमाळा, प्रतिनिधी – दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने मुस्लिम समाजातील लहान बालकांचे खतना कॅम्प शहरातील नालबंद हॉल येथे संपन्न झाले. या कॅम्पमध्ये खतना स्पेशालिस्ट डॉ. उजेर बेग (सोलापूर) यांच्या हस्ते १५८ मुस्लिम बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुख जमादार यांनी दिली आहे.
रविवार दि. २८ रोजी सकाळी ७ वाजता मौलाना मोहसीन शेख, मौलाना सिकंदर, मौलाना अन्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रार्थना करून खतना कॅम्पला सुरुवात करण्यात आली. यावेळी चांद हाजी फारुक बेग, बकश भाई शेख, जावेद शेख, समीर सिकंदर शेख, शाहरुख शेख, असीम बेग, समीर दाऊद शेख, आयान बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना मौलाना मोहसीन म्हणाले की, इस्लाम धर्मात खतना विधीचे विशेष महत्त्व आहे. मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने शहरात दरवर्षी कॅम्प राबवून मुस्लिम समाजातील बालकांसाठी उत्तम सोय केली जात. अशा कॅम्प मध्ये पैशाची प्रचंड प्रमाणात बचत होते. मुस्लिम विकास परिषदेचा हा समाजोपयोगी उपक्रम दरवर्षी राबविण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या खतना कॅम्पला मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. वजीर शेख, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, माजी नगरसेवक हाजी अल्ताफ तांबोळी, नगरसेवक संजय सावंत, ॲड. नईम काजी, जेष्ठ पत्रकार अशोक नरसाळे, नासीर कबीर, अशपाक सय्यद, सुरज शेख, मुस्तकीन पठाण आदींनी भेट दिली
सदर खतना कॅम्प यशस्वी करण्यासाठी समद दाळवाले, युवा नेते अरबाज बेग, फिरोज बेग, तौफिक शेख,जमीर मुलाणी, हाजी हमीद सय्यद, इरफान मिर्झा, पप्पू पठाण, आफताब पठाण, शाहीद बेग, नदीम शेख, नवाज बेग, साहील शेख, अमन शेख, इम्तियाज पठाण, मजहर नालबंद आदींनी परिश्रम घेतले.