शहरातील पाणीटंचाई बाबत त्वरित उपाययोजना करण्याची माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे यांची मागणी…


प्रचार बैठकीत करमाळ्यातील व्यापाऱ्यांनी आ. शिंदे पुढे मांडल्या तक्रारी…
करमाळा, प्रतिनिधी – माढा लोकसभेसाठी महायुतीतून भाजपाचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहरातील चिवटे रेस्टॉरंट येथे शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी शहरातील पाणीटंचाई, अस्वच्छता, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, महावितरणची धोकादायक वितरण यंत्रणा आदी समस्या आमदार शिंदे यांच्यासमोर मांडल्या.

शहरात सध्या पाच ते सहा दिवसानंतर अपुऱ्या दाबाने तसेच अस्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले जाते. पाणीपुरवठ्यातील अनियमिततेमुळे ऐन उन्हाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. यामुळे शहरात तात्काळ टँकर चालू करण्याची मागणी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी केली. याच बरोबर शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेला भ्रष्टाचारी ठेकेदार बदलून शहरात रोजच्या रोज स्वच्छता ठेवण्याची, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न, भूमिगत विद्युतीकरण, वाढती अतिक्रमणे व त्यातून वाढणाऱ्या गुन्हेगारीलाआळा घालण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली.

याबाबत बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, कोरोना काळ, सत्तांतर या अडचणींवर मात करत शहर व तालुक्यातील अनेक समस्यांबाबत योग्य तो पाठपुरावा करून अनेक विकास कामे मंजूर करून ती पूर्णत्वास नेली आहेत. तथापि गेल्या अडीच वर्षाच्या काळात करमाळ्यातील एकाही नगरसेवक किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील अडचणी माझ्यासमोर मांडल्या नाहीत. इथून पुढे नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना अमलात आणल्या जातील, अशी ग्वाही आमदार शिंदे यांनी यावेळी दिली.

या बैठकीला करमाळा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे, बाजार समिती व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय दोशी यांच्यासह सुनील लुनिया, राधेश्याम देवी, महावीर सोळंकी, पियुष गांधी, पप्पूमल सिंधी, विकास कटारिया, अशोक दोशी, विकास कटारिया, दीपक कटारिया, पांडुरंग भिंगारे, बाळू बागडे, संजय ओतारी, सूर्यकांत चिवटे, अनिल भाऊ वाशिंबेकर, पप्पू सय्यद, अलीम बागवान, राजू बागवान, अतुल दोशी, उत्कर्ष गांधी, प्रदीप देवी, रुद्रकुमार चोपडे, सुरज कांबळे, उपाध्ये काका, रवी संचेती, अशोक दोशी, राजकुमार दोशी
आदी प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते. या बैठकीत सर्व व्यापाऱ्यांनी एकमुखाने रणजीतसिंह निंबाळकर यांना निवडून देऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निश्चय केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजित बागल, स्नेहल कटारिया, प्रदीप बनसोडे, रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण, बाबासाहेब तोरणे यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

शहरातील व्यापाऱ्यांच्या सर्व अडीअडचणींवर मात करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल. कोणत्याही व्यापाऱ्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर त्याच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभी असेल.
– महेश चिवटे,
जिल्हाप्रमुख, शिवसेना.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page