अखेर दिग्विजय बागल यांच्यासह १७ जणांवर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल…
करमाळा, प्रतिनिधी – मकाईच्या थकीत बिलांबाबत वारंवार मागणी करूनही बिल न मिळाल्यामुळे आळजापूर येथील समाधान शिवदास रणसिंग या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ॲड. अनिल पुंजाबा कांबळे यांच्यामार्फत करमाळा न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती. यानंतर न्यायाधीश श्रीमती बी. ए. भोसले यांनी गुरुवार दि. ४ रोजी मकाईच्या तत्कालीन संचालक मंडळावर (मयत संचालक वगळून) गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार करमाळा पोलिसांनी श्री मकाई सहकारी साखर लि. भिलारवाडी पो. जिंती. ता. करमाळा जि. सोलापूर या संस्थेला महाराष्ट्र सह. संस्था अधि. 1960 अन्वये नोंदणीकृत केलेली कायदेशीर अभिव्यक्ती गृहीत धरून या संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणाऱ्या तत्कालीन संचालक मंडळातील 2017-2018 या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या १६ संचालक आणि तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक (जे सध्या देखील याच पदावर काम पाहत आहेत) यांच्यासह एकूण १८ जणांवर ऊस नियंत्रण आदेश १९६६ कलम -३ आणि जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ३ व ७ अन्वये तसेच आय.पी.सी. कलम-४२० व ४०६ सह कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या आदेशानुसार
1) श्री दिग्विजय दिगंबरराव बागल, वय-31 वर्षे, धंदा-चेअरमन, रा. मांगी, ता. करमाळा जि. सोलापूर,
2) श्री उत्तम विठ्ठल पांढरे वय 60 वर्षे, धंदा-संचालक रा. पारेवाडी, ता. करमाळा जि. सोलापूर
3) श्री महादेव निवृत्ती गुंजाळ वय 65 वर्षे, धंदा-संचालक रा. भगतवाडी, ता. करमाळा जि. सोलापूर
4) श्री नंदकिशोर विष्णुपंत भोसले वय 48 वर्षे, धंदा-संचालक रा. कोंढार चिंचोली, ता. करमाळा जि. सोलापूर
5) श्री गोकुळ बाबुराव नलवडे वय-46 वर्षे, धंदा-संचालक रा. आवाटी, न. करमाळा जि. सोलापूर
6) श्री बाळासाहेब उत्तम सरडे वय-50 वर्षे, धंदा-संचालक रा. सोगांव (पू) ता. करमाळा जि. सोलापूर
7) श्री महादेव त्रिबंक सरडे वय-47 वर्षे, धंदा-संचालक रा. चिखलठाण नं. 2 ता. करमाळा जि. सोलापूर
8) श्री सुनिल दिंगबर शिंदे वय-48 वर्षे, धंदा-संचालक रा. बोरगांव ता. करमाळा जि. सोलापूर
9) श्री रामचंद्र दगडु हाके वय-50 वर्षे, धंदा-संचालक रा. कावळवाडी, ता. करमाळा जि. सोलापूर
10) श्री धर्मराज पंढरीनाथ नाळे वय-51 वर्षे, धंदा-संचालक रा. मोरवड, ता. करमाळा जि. सोलापूर
11) श्री नितीन रामदास राख वय-40 वर्षे, धंदा-संचालक रा. वंजारवाडी, ता. करमाळा जि. सोलापूर
12) सौ. रंजना बापु कदम वय-38 वर्षे, धंदा-संचालिका रा.कंदर, ता. करमाळा जि. सोलापूर
13) सौ.उमा सुनिल फरतडे वय-33 वर्षे, धंदा-संचालिका रा. हिवरे, ता. करमाळा जि. सोलापूर
14) राणी सुनिल लोखंडे वय-36 वर्षे, धंदा-संचालिका रा. नेरले, ता. करमाळा जि. सोलापूर
15) श्री संतोष साहेबराव पाटील वय-55 वर्षे, धंदा-स्विकृत संचालक रा. मांजरगांव ता. करमाळा जि. सोलापूर
16) श्री दत्तात्रय म्हाळु गायकवाड वय 52 वर्षे, धंदा-स्विकृत संचालक रा. जिंती, ता. करमाळा जि. सोलापूर
17) श्री हरिशचंद्र प्रकाश खाटमोडे वय-50 वर्षे, धंदा-प्र. कार्यकारी संचालक रा. भिलारवाडी ता. करमाळा
या आरोपींवर फसवणूक, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे पुढील तपास करीत आहेत.