माढा तालुक्यात रस्त्याची सुरु असलेली निकृष्ट दर्जाची कामे त्वरित थांबवाअन्यथा रस्त्यावर उतरू; जनशक्ती संघटनेचा आंदोलनाचा इशारा…



माढा, प्रतिनिधी – सोलापूर जिल्हयाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी आणि कार्यकारी अभियंता बांधकाम क्र.२ सोलापूर येथील हनुमंतकुमार चौगुले यांच्या आशीर्वादाने माढा तालुक्यातील सुरू असलेली कामे अतिशय उत्कृष्ट दर्जाची होत असून ही कामे त्वरित थांबवून अधिकारी व ठेकेदार यांचे कॉल डिटेल्स काढून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा एका निवेदनाद्वारे जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे.

Advertisement

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये निघालेल्या ई निविदा आणि क्र. ई. निविदा आणि क्र. ई. निविदा ५६ सन ७ डिसेंबर २०२३ रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार बिड कॅपॅसिटी चेक करणे गरजेचे असतांना तसे न करता ही कामे तसेच ओपन करण्याचे काम चालु आहे. तरी तसेच या कामांना इसारा रक्कम ही ठेकेदाराच्या लिगल अकाऊंटवरुन आली आहे का? सर्व नोंदणी प्रमाणपत्रे खरी व सत्य आहेत का ? सी ए प्रमाणपत्र आणि बॅलन्स शीट मध्ये तफावत आहे का? दिनांक ०७/१२/२०२३ च्या निर्णयानुसार बीड कॅपॅसिटी व मनुष्यबळ ऑनलाईन क्यु आर बेस आहे का? प्रोजेक्ट मॅनेजर व बी ई सिव्हील आहे का? ५ वर्ष अनुभवी आहे का ? अनुभव प्रमाणपत्र जोडले आहे का? हातावर असलेली कामे व काम पुर्णत्वाची प्रमाणपत्रे सत्य आहेत का? तसेच सर्व प्रमाणपत्र साक्षांकित अधिका-यांकडून प्रमाणित करुन घेतलेले आहे का? मशिनरीची बिले खरी व सत्य आहेत का? काही कंत्राटदार प्रमाणपत्र / मशिनरी बिल हे खाडाखोड करुन तयार करतात त्याची योग्य ती चौकशी करण्यात आली नाही.

ब-याच कंत्राटदाराकडे तांत्रीक कर्मचारी PTR प्रमाणात आढळुन येत नाही. आर एम जी प्लॉट मेकॅनिकल इंजिनिअर आहे का? त्याचे ५ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र जोडलेले आहेत का? १० वर्षे जुन्या मशीनचे फीटनेस प्रमाणपत्र जोडले आहे का? व ते वैध आहे का १ वर्षाची व्हॅलिडीटी आहे का? संबंधीत काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र सदरील विभागाकडून व्हेरीफिकेशन करण्यात आले आहे का? बॅलन्स शीट मध्ये एजेंट असतात म्हणजे सर्व मालमत्ता जोडलेली आहे का? जी एस टी रिटर्न भरले आहे? का त्याचे टर्नओव्हर प्रमाणपत्र जोडले आहे का ? व्यवसाय कर भरला आहे का? तसेच मशिनरी इन्वहाईज ओरीजनल आहे का? कॉक्रिट मिक्सर / वायबरेटर / वॉटर टँकर रोलर सेटरिंग प्लेट आहे का ?

ही सर्व तपासणी करणे गरजेचे असतांना सुध्दा जाणीवपुर्वक सदर अधिकारी हे पेपर चेक करणे टाळतात. आणि विचारणा केली असता हया गोष्टीला खुप दिवस लागतील अशी उडवाउडवीची उत्तर देऊन मोकळे होतात. परंतु जे कामे कमी दराने असतील त्याचे पेपर चेक करुन त्याला अपात्र केले जाते. तरी कमी दराने आलेल्या ई निविदा धारक ठेकेदारावर अन्याय केला आहे.

अशाप्रकारे ठेकेदाराची संगणमत करून अधिकाऱ्यांनी माया कमावली असून यामुळे ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. त्यामुळे ही सुरसलेली कामे त्वरित थांबवावी अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरून हलगी नाद आंदोलन करेल असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page