सुनिल (बापू) सावंत यांचा आज जाहीर नागरी सत्कार…
करमाळा, प्रतिनिधी – सोलापूर जिल्हा काँग्रेस (आय) चे सरचिटणीस व सावंत गटाचे युवा नेते सुनिल (बापू) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते फारुख जमादार यांनी दिली आहे. आज मंगळवार दि.१२ मार्च रोजी सायं.०६ वा. ३० मि. शहरातील सावंत गल्ली येथील मारुती मंदिरा समोर हा सोहळा होणार आहे.
कामगार नेते स्व. सुभाषअण्णा सावंत यांचा आदर्श घेऊन राजकारणासह सामाजिक कार्यातही सुनील बापू सावंत यांचा सदैव सहभाग असतो. सावंत गटाच्या तसेच छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांत सुनील बापूंचे भरीव योगदान असते. त्यामुळे युवा वर्गात ते विशेष लोकप्रिय आहेत. त्यामुळे या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शहर व तालुक्यातील सर्व मित्रमंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.