रुबीना मुलाणी आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित; सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान…



करमाळा, प्रतिनिधी – अलीम शेख, (मो.नं. 98 50 68 63 60)

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका म्हणून करत असलेल्या उत्कृष्ट कामासह सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तालुक्यातील शेलगाव (वीराचे) येथील सौ. रुबीना कमुलाल मुलाणी यांना २०२२-२३ च्या ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरीकीले, पर्यवेक्षिका सौ. आतकर, सौ वंदना चोले, सी डी पी ओ आनंद जाधव, विस्तार अधिकारी रणदिवे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा सोलापूर येथे पार पडला.

सौ. मुलाणी या सध्या शेलगाव येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. सौ. रुबीना मुलाणी यांना ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ पुरस्कार मिळाल्याबद्दल करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव, विस्तार अधिकारी संदीप रणदिवे, शेलगाव येथील सरपंच आत्माराम वीर, ग्रामसेवक खाडे भाऊसाहेब, तसेच सचिन वीर, लखन डावरे व राहुल कुकडे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

जिल्हा परिषदेने आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून रुबीना मुलाणी यांना सन्मानित केल्याबद्दल योग्य व्यक्तीचा सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया समाज मनातून येत आहेत. महिला व बाल विकासाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात मुलाणी या नेहमीच अग्रेसर असतात. पालकांच्या शैक्षणिक उणीवांबाबत जागृती करण्याचे काम त्या चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

माझ्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत स्वच्छ व पारदर्शकपणे काम केल्याबद्दल मला सदरचा पुरस्कार मिळाला आहे. माझ्या उत्कृष्ट कामाची दखल जिल्हा परिषदेने घेऊन मला माझा सन्मान केला त्याबद्दल जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभार मानते. भविष्यात असेच उत्कृष्ट कार्य करून मी माझ्या गावाचे तसेच तालुक्याचे नाव उंचावर नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
-आदर्श अंगणवाडी पुरस्कार प्राप्त सौ. रुबीना मुलाणी.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page