शाळेच्या विकासासाठी पालकांनी योगदान द्यावे -प्रा .गणेश करे-पाटील…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील देवळाली येथील वैद वस्ती जि.प.प्रा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. २४ रोजी उत्साहात पार पडले. यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी विविध पारंपरिक तसेच देशभक्तिपर गीतांतून समुह नृत्य तसेच नाटीकेतून समाजप्रबोधनपर संदेश दिला.
शनिवारी देवळाली गावातील वैद वस्ती येथील शाळेत झालेल्या स्नेहसंमेलनावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देवळाली गावच्या सरपंच सौ.अश्विनी धनंजय शिंदे, माजी सरपंच आशिष गायकवाड व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पडवळे व सदस्य, गावातील इतर मान्यवर, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांना त्यांनी पुरेपूर दाद देऊन कौतुक केले. यावेळी गणेश करे पाटील यांनी शाळेला एक स्मार्ट टीव्ही भेट दिला तसेच शाळेच्या विकासासाठी सर्वांनी सहयोग देण्याचे आवाहन केले.
याचबरोबर वैदू समाज मित्रमंडळाने शाळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प भेट दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रफुल्लता सातपुते तसेच शांतीलाल खाडे यांनी परिश्रम घेतले.