पक्ष व चिन्हाच्या निर्णयानंतर करमाळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील सुभाष चौकात जोरदार जल्लोष…
करमाळा, प्रतिनिधी – मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत पक्ष व घड्याळाचे चिन्ह अधिकृतपणे आपलेच असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी केली. या घटनेनंतर कारमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळी व युवा कार्यकर्त्यांनी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून, उपस्थित नागरिकांना लाडू चे वाटप करून हलगीच्या तालावर जोरदार जल्लोष साजरा केला.
“महाराष्ट्राचा एकच वादा अजित दादा … अजित दादा” अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष भरत आवताडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, विधानसभा कार्याध्यक्ष सुजित बागल, युवक तालुकाध्यक्ष किरण फुंदे, तालुका कार्याध्यक्ष अक्षय गायकवाड, शहर कार्याध्यक्ष बाप्पुसाहेब तांबे, शहर युवक अध्यक्ष सोहेल पठाण, शहर युवक कार्याध्यक्ष रामा करंडे, जेष्ठ नेते विवेक येवले, रावगावचे दादा जाधव, भोसेचे सरपंच भोजराज सुरवसे, खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी, बबलू पठाण, नागेश दुधाट, प्रवीण केकाण यांच्यासह तालुक्यातील व शहरातील असंख्य उपमुख्यमंत्री अजित दादांवर व आमदार संजय मामांवर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.