सौ.धनश्री विकास गलांडे यांची करमाळा तालुका महिला सरपंच अध्यक्षपदी निवड…
करमाळा, प्रतिनिधी – सरपंच परिषद (मुंबई, महाराष्ट्र) घ्या वतीने करमाळा तालुक्यातील चिखलठाण ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ.धनश्री विकास गलांडे यांची करमाळा तालुका महिला सरपंच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सोलापूर येथे झालेल्या बैठकीत सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महीला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे, चिखलठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष विकास गलांडे उपस्थित होते.
नियुक्तीनंतर करमाळा तालुक्यातील विविध गावच्या ग्रामपंचायतीच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती गलांडे यांनी दिली. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मंडळींकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.